करमाळा प्रतिनिधी

मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या दि.१२ रोजी झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रावगाव येथे शुक्रवार दि. १३ रोजी तालुका माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक तथा ग्रा.पं. सदस्य भाऊसाहेब बुधवंत सर यांच्या संकल्पनेतून रावगाव व परिसरातील नागरिकांसाठी ‘मोफत आरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले. हे शिबीर हनुमान मंदीरा समोरील

सभामंडपात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडले. या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. हे शिबीर सर्वसामान्यांसाठी धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या बाबतीत जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटनप्रसंगी कृ.ऊ. बाजार समिती चे माजी संचालक तथा माजी सरपंच दादासाहेब जाधव, भाऊसाहेब

बुधवंत सर,माजी सरपंच विलास बरडे,माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, ग्रा.पं सदस्य दादा पवार, सुहास जवंजाळ सर,दादा कांबळे, भास्कर पवार, सुनिल जाधव, अनिल काळुंखे, माजी सरपंच भाऊसाहेब फुंदे, वि.का. सोसायटीचे सदस्य, इ. सह गावातील बुजूर्ग मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबीरात साडे आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.पुंडे, बार्शीचे मुळव्याध तज्ञ डॉ. नागरगोजे, अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन निंबाळकर, डॉ.अपेक्षा शिंदे, डॉ.डोळस, पुणे येथील डॉ. एच. व्ही.देसाई हॉस्पीटल चे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी सुदर्शन केकाण, बंडगर, पठाण, आदी तज्ञ डॉक्टर्स व त्यांच्या टीम ने नागरिकांच्या तपासण्या व उपचार केले. यामध्ये ३०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, शुगर, रक्त तपासणी, मुळव्याध तपासणी, गुडघे, मणका तपासणी, रक्त तपासणी इ. सह साथीच्या आजारांवर मोफत उपचार करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याने या समाजपयोगी उपक्रमाचे कौतुक होत असून इतरांसाठी हा उपक्रम निश्चितपणे पथदर्शी व आदर्शवत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *