
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली व त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग सुकर झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी करमाळा येथील एमआयडीसीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असा विश्वास संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

