
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभेवर पुन्हा एकदा नारायण पाटलांनी बाजी मारली असून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झालेला असून बागलांची पराभवाची हॅट्रिक झालेली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील यांनी ९६०९१ मते घेत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा १६०१९ मतांनी पराभव केला असून संजयमामा शिंदे यांना ८०००६ एवढी मते तर शिंदे गटाकडून लढत असलेले दिग्विजय बागल यांचा पराभव झालेला आहे. बागल यांना ४०५४१ एवढी मते मिळाली.

२००४ पासून गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेली लोकप्रतिनीधी बदलाची परंपरा यावेळी कायम राहिली, पहिल्यापासून पारंपरिक पाटील-शिंदे-बागल गटात झालेल्या तिरंगी लढतीत अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी नारायण पाटील विजयी झाले आहेत. तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे आणि प्रथमच निवडणूक लढवित असलेले दिग्विजय बागल यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे.
……………..
नारायण पाटलांना छोट्या गटांनी तारले
राष्ट्रवादी प्रवेश आणि आमदार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत असलेले नारायण आबा पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळला. याचे कारण म्हणजे २०१९ ला निसटता पराभव झालेला, गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क, पाच वर्षातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मिळालेले मतदान, लोकसभा निवडणूकीत खासदार मोहिते-पाटील यांना मिळालेले ४२ हजारांचे मताधिक्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, खासदार शरद पवार यांच्याबबद्दलची सहानुभूती, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, माजी आमदार जयवंतराव जगताप व सुनील सावंत यांनी दिलेला पाठिंबा, माजी आमदार पाटील यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला आहे
………….
संजयमामा शिंदे यांनी घड्याळ घेतले नाही त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला
विधानसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्यासाठी सभा घेतली त्या सभेत ३ हजार कोटींची विकास कामे झाल्याचे अजितदादा बोलले होते.तसेच लाडकी बहीण गेमचेंजर आहे याचा फायदा संजयमामा यांना मिळाला नाही धनुष्य बाणाला मते मिळाली यामुळे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झालेला आहे.
…………..
बँक फुटला गेलेल्या बागल गटाला धनुष्यबाणा मुळे उभारी मिळाली
२०१४, २०१९ आणि २०२४ ला अशी पराभवाची हॅट्रिक बागल गटाची झालेली आहे, निवडणूक लागल्यापासून दिग्विजय बागल हे रेस मध्ये येतील असे वाटत होते पाटील-शिंदे-बागल अशी तिरंगी असणारी निवडणूक दुरंगी मोडवर आली. एकेकाळी एक नंबरला असलेल्या बागल गट मध्ये बँक फुटला गेला धनुष्य बाणामुळे उभारी मिळाली बागल गट पुन्हा तयार होत आहे