करमाळा प्रतिनिधी

कुर्डुवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या 244 करमाळा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. या प्रचारसभेत डॉ.कोल्हे यांनी नारायण आबा पाटील उमेदवार म्हणजे खुद्द शरदचंद्र पवार उमेदवार आहेत समजून आबांना विजयी करा असे आवाहन केले.

आपल्या भाषणात डॉ.कोल्हे यांनी संजयमामा शिंदे व बबनदादा शिंदे या दोघांवरही सडकून टीका केली. एकीकडे पवार यांचे उंबरे झिजवायचे व दुसरीकडे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून अपक्ष लढायचे असे अविश्वासू दोन्ही बंधूंना पवार यांच्या आदेशाचे पालन करत पराभूत करा असे आवाहनही केले. कुर्डुवाडी व परिसरातील जनता ठाकरे घराण्यावर व पवार यांच्यावर प्रेम करणारी आहे. ज्यांनी उद्दव ठाकरे यांच्या व पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला, संकट काळात आधार द्यायचा सोडून विश्वासघात केला अशा दोन्ही शिंदे बंधूंना पराभूत करून दाखवून द्या की, करमाळा,माधा मतदारसंघातील जनता ही गद्दारांना माफी करत नाही.

आजच्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते हुजुर इनामदार यांनीही मुस्लिम बांधवांचे एकही मत भाजप व महायुतीचा छुपा पाठिंबा घेणाऱ्या शिंदेंना पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

खासदार डॉ.अमोल कोल्हे, हुजुर इनामदार व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भाषणाने करमाळा तालुक्यासह छत्तीस गावातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रचार सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेतकरी नेते अतुल खूपसे, घटनेकर पाटील, कुर्डूवाडीचे नेते दत्तात्रय गवळी, म्हैसगावचे सरपंच सतीश उबाळे यांची भाषणे झाली.

व्यासपीठावर माढा तालुक्याचे नेते बी. डी पाटील (बप्पा) यांचेसह माढा तालुक्यातील अनेक मोठे नेते उपस्थित होते.  यावेळी उमेदवार नारायण आबा पाटील यांना मुस्लिम बांधवांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *