करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणा अशा सूचना पुर्वी स्व. डॉ. प्रदीप कुमार जाधव पाटील यांनी केले होते त्यानुसार आम्ही प्रयत्न करीत असल्याची माहिती युवा नेते अजिंक्य पाटील यांनी
सांगितली आहे. तरटगाव संगोबा बंधारा लातूर टाईप बँरेजेस व्हावे त्यावेळी डाँ. आबांनी पुर्वी व्यक्त केली होती. त्यावेळी आदिनाथचे मा. चेअरमन संतोष जाधव पाटील, डाँ. रोहन जाधव पाटील, तरटगावचे सरपंच अभिजित जाधव पाटील,
उध्दव माळी आदिजण उपस्थित होते. परिसरातील बंधाऱ्यासंदर्भात तसेच या भागातील नागरिकांच्या विविध समस्या आमदार संजयमामा यांनी त्यावेळेस मागील लावले जातील असे सांगितले होते. त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी बऱ्यापैकी या भागातील समस्या दूर केल्या आहेत यामुळे
आता आपण आमदार संजय मामा शिंदे यांना निवडून आणण्याची वेळ आली आहे पुढील पाच वर्षात विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान युवानेते अजिंक्य पाटील यांनी केले आहे.