करमाळा प्रतिनिधी

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आपला मुलगा देखील ५०% अस्थिव्यंग आहे. त्याची इच्छा होती की, माझ्याकडून देखील काहीतरी मूकबधिर मतिमंद बांधवांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून वाढदिवसाचा अनावश्यक खर्च

टाळून श्री मुखबधिर विद्यालय वाघोली या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना (सचित्र बालमित्र, अक्षर उजळणी, वह्या पुस्तके) शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले. समाज कार्यामध्ये घारगाव येथील सरवदे कुटुंब हे

नेहमीच समाजकार्यात व शिक्षणाच्या बाबतीत सतत मदत करीत असते‌. त्यामुळे शाळेच्या वतीने सरवदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने वह्या व पुस्तके

भेट देत सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. इतरांनीही असेच अनुकरण करावे व मतिमंद, मूक बधिर, अस्थिव्यंग बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे, लक्ष्मी सरवदे माजी सरपंच यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *