करमाळा प्रतिनिधी

उजनी धरण 100% काटोकाठ भरलेले असताना नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे करमाळा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून प्रशासनात तात्काळ याबाबत योग्य ती कारवाई करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नगरपालिकेवर शिवसेना महिला आघाडी घागर मोर्चा काढील असा इशारा शहर प्रमुख कीर्ती स्वामी यांनी दिला आहे.

आज त्यांनी याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांना दिले. यावेळी आरती स्वामी, जया दसंगे, उज्वला शिंदे, आरती सूर्यपुजारी, मंगेश सूर्यपुजारी, बबलू कुलकर्णी, उमेश वनारसे, विजय देशपांडे, आदी नागरिक उपस्थित होते.

विशेषता खडकपुरावर पाणी येत नाही, नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात. तालुक्याचे आमदार व इतर लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. गेल्या वर्षी नियोजन मंडळातून पाईपलाईन दुरुस्तीसाठी 16 लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आली होती. या रकमेचा वापर कशासाठी केला असा प्रश्नही महिलांनी उपस्थित केला आहे. केवळ पाणीपुरवठा सुरू करायचा नावाखाली रोज हजारो रुपयांची बिले नगरपालिकेतून वसूल केली जातात मात्र पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

त्याचप्रमाणे शहरात डेंगूची प्रचंड साथ पसरली असून डासाचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जंतुनाशके वापरली जात नाहीत. नगरपालिकेचे फॉर्मिंग मशीन बंद आहे. नगरपालिकेने आणलेली जंतुनाशक पावडर बोगस आहे.

या सर्व प्रश्नांवर जनता संतप्त झाले असून आता शिवसेना आग्रही झाली असून वेळप्रसंगी बांगडी मोर्चा काढला जाईल असा इशाराही दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *