करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकारी यांना दि.27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर 2 हा सिनेमा मोफत दाखविणार असल्याचे युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळयातील
शिवसेनेची वाटचाल चालू असून धर्मवीर 2 या चित्रपट प्रदर्शना दिवशी शहरातून बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यां विचारांचा वारसा मुख्यमंत्री शिंदे हे चालवित असून डान्स बार असो अथवा बदलापूर सारखी घटना असो तात्काळ अशा नराधमांना शिक्षा होणेसाठी संवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत
तरीच निखिल चांदगुडे यांनी तालुक्यातील सर्व युवकांना बाईक रॅली मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे आणि दिघे यांचा चरित्रावर आधारित असलेल्या चित्रपट सर्व जनतेने बघावा व त्याचा थोर विचार अकस्मात आणावा यासाठी तिकीट दर कमी केले आहेत.