करमाळा प्रतिनिधी

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर हे करमाळा, माढा, बार्शी तालुक्यातील अनुदानित शाळांना त्यांच्या आमदार फंडातून प्रिंटर व संगणक वितरण समारंभासाठी जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे तालुका

करमाळा येथे दिनांक 27/09/2024 रोजी दुपारी दोन वाजता उपस्थित राहणार आहेत. सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षण संस्था संघटना सोलापूर विद्यापीठाचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले उपस्थित राहणार आहेत. सदरची माहिती

करमाळा तालुका स्वयंअर्थ शाळा संघटनेचे संस्थेचे सचिव जयंत दळवी यांनी दिली आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील स्वयंअर्थ शाळांच्या प्रश्नांविषयी संघटनेचे पदाधिकारी नितीन भोगे, ब्रिजेश बारकुंड, संदिपान गुटाळ, अमोल दुरंगे, तानाजीराव करचे व सर्व संस्थाचालकांच्या समवेत आमदार आसगावकर यांच्याशी चर्चा करणार आहेत.

तरी तालुक्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित तसेच स्वयंअर्थ संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्यांनी उपस्थित रहावे असे अहवान श्री भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळा चे सचिव युवराज बिले यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *