
करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, करमाळा तालुका यांच्या वतीने मिरगव्हाण येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व भव्य शेतकरी मेळावा, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासो सरडे, माजी सरपंच अभिजीत मुरूमकर, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल पवार, तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे, सहकार सेल तालुका अध्यक्ष अजिनाथ सुरवसे, तालुका सरचिटणीस नितीन झिंझाडे, तालुका उपाध्यक्ष उमेश मगर, तालुका अध्यक्ष किसान मोर्चा सोमनाथ घाडगे, तालुकाध्यक्ष डॉक्टर सेल प्रमोद शिंदे, तालुका उपाध्यक्ष दादासो देवकर, उपसरपंच नितीन निकम, नाना अनारसे, मच्छिंद्र हाके, नवनाथ खाडे, इ. मान्यवर तसेच यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मिरगव्हाण पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.