करमाळा प्रतिनिधी

झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने अतिशय उत्साहपूर्ण वातावरनामध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले सर, सचिव युवराज बिले सर, संचालिका स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते. अनेक पालकांनी शैक्षणिक व्यवस्थेबद्दल आपले विचार व्यक्त केले. अध्यक्ष जयप्रकाश बिले सर यांनी अनमोल विचार व्यक्त केले व पालकांशी संवाद सादला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता साळुंखे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सतिश कोंडलकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *