
करमाळा प्रतिनिधी
नेरले हे गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे व गौंडरे साडेतीन हजार लोकसंख्येचे आहे. गावात दोन विद्यालय व डीसीसी बँकेची शाखा आहे. सीना कोळगाव प्रकल्प जवळच आहे. नेरले वरून गौंडरेला अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेच्या कामासाठी

जातात तसेच आवाटी, सालसे, निमगाव, कोळगाव, हिसरे, हिवरे येथून देखील अनेक विद्यार्थी व नागरिक बँकेचे कामासाठी प्रकल्पाकडे जाण्यासाठी गौंडरे येथे येतात. नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांना कुर्डूवाडी येथून रेल्वेने सोलापूर, पुणे, मुंबई, इतर ठिकाणी जाण्यासाठी व करमाळा येथे शासकीय कामासाठी येणे जाण्यासाठी एसटीची अत्यंत गरज

आह. त्यामुळे करमाळा कुर्डूवाडी बस हिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, नेरले, वरकुटे, बारलोणी मार्गे कुर्डूवाडी व त्याच मार्गे परत करमाळा अशी मागणी नेरले ग्रा.पं. माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी नेरले व गौंडरे ग्रामपंचायत ठराव सह केली होती व वर्तमानपत्रांमध्ये बातमी देखील आली होती. नागरिकांच्या मागणीचा व वर्तमानपत्राच्या बातमीचा विचार करून दि. 26/08/2024 सोमवारी बस सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे नेरले, गौंडरे, निमगाव, हिवरे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूचे विशेष आभार नागरिकांच्या वतीने मानले. नागरिकांनी सोमवारपासून कुर्डूवाडी व करमाळा जाण्यासाठी बसने प्रवास करावा अशी विनंती नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.