
करमाळा प्रतिनिधी
आळसुंदे येथे नेरले तलाव दहिगाव उपसा सिंचन या योजनेतून भरावा यासाठी रस्ता रोको आंदोलन झाले. आंदोलनात सुरुवात होत असताना अनेक शेतकरी कार्यकर्त्यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. ज्यामध्ये दहीगाव सिंचन योजनेतून नेरले तलाव भरून शेतकऱ्यांचे हाल बंद करा. दहिगाव उपसा सिंचन योजना या अंतर्गत 29 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेच्या प्रारंभिक मंजुरीस 28 वर्षे पूर्ण होत आहेत. ही योजना 1996 साली मंजूर झाली असून आजतागायत ही योजना पूर्णत्वास आलेली नाही. 28 वर्षांपूर्वीच्या मंजुरीमध्ये आळसुंदे गाव लाभक्षेत्रात होते आणि आहे परंतु असे असताना देखील संबंधित योजनेच्या लाभाचा हिस्सा कधीही आळसुंदे गावास मिळाला नाही. यामुळे आळसुंदे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नांमुळे सदर आंदोलन आळसुंदे फाटा येथे घेण्यात आले.

या आंदोलनात नेरले तलाव क्षेत्रातील सर्व शेतकरी सालसे, नेरले, वरकुटे या गावचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकाच्या मागणीप्रमाणे उजनीतील अतिरिक्त पाणी सोलापूर कर्नाटकला सोडण्यापेक्षा ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याच तालुक्यातील लोकांना मिळावे आणि ओव्हर फ्लो च्या पाण्याने तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व पाजर तलाव तसेच नेरले तलाव भरून घ्यावा अशी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी अवताडे कुकडी डावा कालवा यांच्याकडे मागणीचे पत्र दिले. परंतु त्यावर त्यांनी उपाययोजना न करता आणि टेल टू हेड असा या योजनेचा नियम असताना देखील पाणी त्याला सोडले नव्हते. म्हणून आज परिसरातील सर्व शेतकरी बांधव एकत्र येत आंदोलन केले. आंदोलनात परिस्थिती चिघळल्याने पोलिसांच्या मध्यस्थीने आणि कुकडी डावा कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी पत्राने हे आंदोलन स्थगित केले.विभागाच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पाणी आळसुंदे लाभक्षेत्राला देण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडल्याने परिसरातील व आळसुंदे ग्रामस्थ यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

परंतु अधिकाऱ्यांनी लेखी दिलेला शब्द नाही पाळला तर मुख्य अभियंता कृष्णा खोरे विकास महामंडळ सिंचन भवन पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असे यावेळी जाहीर केले. यावेळी आंदोलनास आळसुंदेचे गावचे सरपंच संजय धारेकर, माजी सरपंच सोमनाथ देवकते, उपसरपंच बाजीराव घाडगे, शहाजी घाडगे, ज्योतिराम घाडगे, गणेश देवकते, जयसिंग घाडगे, राणा वाघमारे, परम मोरे, औदुंबर राजे भोसले, सतीश बापू निळ, सतीश रूपणर, तानाजी लोकरे सर, बालाजी घाडगे, जयसिंग पाटील, कुमार पाटील, गणेश देवकते, राजेंद्र देवकते, अनिकेत घाडगे, अक्षय घाडगे, विजय देवकते, आबा देवकते, सौरभ धारेकर, शुभम धारेकर, गणेश कोळी, नवनाथ सरवदे, संभाजी सरवदे, धनाजी सरवदे, श्रीकांत येवले, राघू दादा घाडगे, तात्या सरडे, शहाजी देवकते, धर्मेंद्र येवले आणि अनेक आळसुंदे चे गावकरी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.