मा आ नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलठाण येथे विविध सामाजिक उपक्रम
करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम चिखलठाण येथे राबविण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध बुधरानी हॉस्पिटलचे नेत्र शिबिराचे उद्घाटन जेऊरचे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणवेश वाटप, बक्षीस वितरण करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती चिखलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे ,चिकलठाण ग्रामपंचायतचे सरपंच सौ धनश्री गलांडे ,आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, संदिपान बारकुंड, दत्तात्रेय सरडे, रावसाहेब नेमाने, उपसरपंच योगेश सरडे, आबासाहेब मारकड, ग्रामपंचायत सदस्य हेमंत बारकुंड ,आनंद पोळ, संभाजी कांबळे ,मनोहर गव्हाणे, पुष्पा चव्हाण, महादेव सरडे, कुगावचे सरपंच महादेव पोरे, कैलास बोंद्रे, विजय कोकरे, अविनाश सरडे, बाळासाहेब कोकाटे, साहेबराव मारकड, सुरेश चव्हाण, फिरोज तांबोळी, सतीश बनसोडे, बिभीषण कळसाईत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी 267 लोकांनी नेतृत तपासणी केली व चष्मा वाटप करण्यात आला तसेच 34 लोकांना 27 ऑगस्ट रोजी मोतीबिंदू ऑपरेशन साठी पुणे येथे मुद्राणी हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे अशी माहिती विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विकास गावंडे यांनी दिली आहे