करमाळा प्रतिनिधी

       अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षण वर्गवारी संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्यामुळे एससी एसटी समाजाने भारत बंदची हाक दिलेली होती. यामध्ये उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती, वंचित बहुजन

आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दर्शविला होता. याच धर्तीवर करमाळ्यातील sc, st समाजाच्या वतीने यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा बंद पुकारण्यात आला होता व शहरांमधून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात करण्यात आली त्यानंतर लोकशाहीर

आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांना हार घालून मोटर सायकल रॅली ची सांगता करण्यात आली. यशपाल कांबळे यांनी पुकारलेल्या करमाळा बंदच्या हाकेला शहरातील व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेले मेन रोड, दत्त पेठ, राशीन पेठ, पोथरे नाका, जय महाराष्ट्र चौक, गुजर गल्ली, बस स्थानक परिसर, कसाब गल्ली, पुणे रोड, जीन मैदान येथील सर्व व्यापारी व दुकानदार बंदमध्ये सामाजिक होऊन करमाळा बंदला पाठिंबा दर्शविला या बंद चा रॅलीमध्ये एससी एसटी समाज बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *