करमाळा प्रतिनिधी
युवा नेते तथा युवा उद्योजक प्रफुल्ल शिंदे हे मंदिराला एल ई डी दिवे अर्पण करीत असलेली बाब कौतुकास्पद असल्याचे गौरोदगार जगताप गटाचे युवा नेते तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी करमाळा मधील किल्ला विभाग येथे दत्त मंदिरास शिंदे यांच्या वतीने बोर्ड अर्पण करते वेळी केले.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जोपासत प्रफुल्ल शिंदे यांनी आजपर्यंत किल्ला वेस व सावंत गल्ली येथील हनुमान मंदिर, वेताळ पेठ येथील राम मंदिर तसेच तालुक्यातील अनेक मंदिरांना एल ई डी बोर्ड अर्पण दिले असल्याने इतर युवकांना ही यामुळे प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.
किल्ला विभाग येथील दत्त मंदिर पुरातन असून त्याची देखभाल पत्रकार अविनाश जोशी करीत असतात. तसेच या ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून अनेक भाविक दैनंदिन दर्शनासाठी येत असतात. प्रफुल्ल शिंदे यांनी दिलेल्या बोर्ड मुळे मंदिर परिसर भक्तिमय व सुशोभित झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी किल्ला विभागातील अनेक भाविक उपस्थित होते.