जेआरडी माझा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तृप्ती अजय सरोदे यांच्या वतीने सरदवाडी गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका-मदतनीस, बचत गटाच्या सीआरपी, ग्रामसंघाच्या अध्यक्षा, सचिव,कोषाध्यक्षा,लिपिका या अजित भगिनींना साडी-चोळी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सरदवाडी गावचे जेष्ठ नागरिक भजन सम्राट गुरुवर्य सिताराम (बापू) सरोदे यांना ब्राह्मनाद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना हिरकणी प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचा सत्कार व सरदवाडी भूषण या पुरस्काने गौरविण्यात आले.

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्यासाठी काम करण्याचा, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा इथून पुढेही असाच प्रयत्न असेल अश्या भावना तृप्ती सरोदे यांनी बोलून दाखवल्या. दरम्यान ताईंनी सरदवाडी भूषण पुरस्काराची घोषणा केली.  सरदवाडी गावातील राजकीय, सामाजिक, कृषी, आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला इथून पुढे दर वर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येईल अशी माहिती तृप्ती ताईंनी दिली.

शासकीय स्तरावर काम करताना शासनाच्या कोणत्याही योजना शेवटचा घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करण्याऱ्या या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना सन्मानित केल्यानंतर आजपर्यंत केलेल्या कामाला कोणीही कौतुकाची थाप दिली नसल्याची खंत व्यक्त करतानाच आज हिरकणी प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तृप्ती ताईंच्या वतीने हा सन्मान आम्हाला अधिक ऊर्जा देणारा ठरत आहे सांगताना सर्व महिला कर्मचारी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या वैशालीताई नागवडे, पक्षाच्या नेत्या लोचन ताई शिवले, तालुकाध्यक्ष रवी बापू काळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशी भाऊ दसगुडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र तात्या जगदाळे यांनी आयोजित कार्यक्रमाचे कौतुक करताना पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून तृप्ती ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना योग्य ठिकाणी संधी देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. तसेच पक्षाचे विचार, अजित दादांना प्रेरित असणारी कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम हिरकणी प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होत असल्याची भावना आपल्या मनोगतात मान्यवरांनी बोलून दाखवली.

यावेळी मा. सरपंच विलास कर्डीले, शिरूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल वर्पे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका उपाध्यक्ष श्रुतिका निरवणे, मा. सरपंच लक्ष्मी कर्डीले, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा घावटे, मोनाली कर्डीले, सुरेखा निरवणे, किशोर सरोदे, गणेश निरवणे, योगेश सरोदे, पोपट दादा सरोदे, आबासाहेब सरोदे, बाजीराव नाना कर्डीले, रामभाऊ सरोदे, संदीप सरोदे, विकास सरोदे, सुरज घावटे, प्रवीण घावटे, अभिजित घावटे, जालिंदर व्यवहारे व मोठ्या संख्येने महिला भगिनीं व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *