करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वरदान ठरलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना दिलेल्या निवेदनात नीळ यांनी म्हटले आहे की, पूर्व भागातील शेतकर्यांना  दहीगाव उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरली आहे. या योजनेच्या पाण्यावर उस, केळी, फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या दारात समृद्धीचे दिवस येत असतानाच उजनी जलाशयातील पाणी पातळी खालावल्याने ही योजना पाण्याअभावी बंद झाली. परिणामी लाखो रुपये खर्च करून आणलेली पिके वाया गेली. ज्या शेतकर्यांना विहीर बोअरला पाणी होते अशा शेतकर्यांनी प्रयत्न करुन पिके जगवली. सद्या उजनी धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. सध्य स्थितीत दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या जँकवेल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. प्रशासनाने शेतकर्यांन प्रती सहानुभूती पूर्वक विचार करुन दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांतधिकारी कूर्डवाडी, जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.

चौकट

सद्या पुणे जिल्ह्यातील डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पुढील काही दिवसात समाधान कारक पाणी पातळीत वाढ होईल. धरण शंभर टक्के भरल्या नंतर पाणी नदीद्वारे सोडून द्यावे लागते. त्यामुळे आत्ता लगेच दहीगावचे आवर्तन सुरू करुन वडशिवणे तलावा व सीना कोळगाव धरणात पाणी सोडावे व इतर सर्व तलाव भरुन काढणे गरजेचे आहे – सतीश नीळ, संचालक मकाई साखर कारखाना

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *