करमाळा प्रतिनिधी

करमाळा निवडणूक विभाग नावालाच, श्रावण बाळ योजना कागदावरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी व्यवस्थित कार्यालयीन नियोजन करावे अशी मागणी हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.

श्रावणबाळ मंजुरी आली असून त्रुटीची कागदपत्रे मिळत नाहीत, २०२३ पासून श्रावणबाळ योजनेचे अर्ज मंजूर करण्यात आले नाही, यासंदर्भातील वेबसाईट 1 महिना झाले चालत नाही, तसेच यासंदर्भात मिटिंगही होत नाही. असे कारणे मिळत असल्याने वयोवृद्ध नागरिक हैराण झाले आहेत.

विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे नागरिक निवडणूक कार्यालयात मतदान ओळखपत्राच्या कामासाठी जात आहे अधिकारी कर्मचारी उपस्थित नाही व नागरिक निवडणूक कार्यालयात गेले असता कार्यालय चालू आहे पण तेथे एकही कर्मचारी हजर नाही.

जर हे असेच चालू राहिले तर नागरिकांचे प्रश्न कसे सुटणार व नवीन मतदान ओळखपत्र आलेले नागरिकांपर्यंत कसे पोहोचणार ? हा सवाल नागरिकांना पडला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *