
करमाळा प्रतिनिधी
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अशा परिस्थिती मध्ये बँकांचे कर्ज फेडणे शेतकऱ्याला मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना बँकांच्या कर्जातून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालय करमाळाच्या समोर बहुजन संघर्ष सेना निदर्शने करणार आहे.

त्याच प्रमाणे तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये एक महिन्यापासून सरवर डाऊन आहे असे सांगून रेशन कार्डमध्ये नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे व नवीन रेशन कार्ड काढणे ही सर्व कामे ठप्प आहेत. रेशन कार्ड संदर्भातील सर्व कामे व्हावीत ही एक आमची मागणी आहे. तसेच सातबारा दुरुस्ती व सातबारा संदर्भातील अर्ज एक-एक दोन-दोन वर्षापासून तहसील कचेरी मध्ये पडून आहेत. सातबारा संदर्भातील सर्व कामे ताबडतोब व्हावीत ही एक मागणी आहे. या सर्व मागण्या घेऊन बहुजन संघर्ष सेना तहसील कार्यालय करमाळाच्या समोर सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी वेळ 11-00 वाजता निदर्शने करणार आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
