
मिरजेचा मानाचा सारांश पुरस्कार -अंजली राठोड श्रीवास्तव यांच्या छोटुली सिआरा या बालकाव्यसंग्रहास प्राप्त
२०२४ चा गोवा,कोकण,कर्नाटक व महाराष्ट्र मासिक सारांशचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मिरज येथे संपन्न झाला
साहित्य क्षेत्र व दिवाळी अंकासाठी विविध शहरातील साहित्यिक व संपादकांना एकूण पंचवीस पुरस्कार सारांश तर्फे देण्यात आले.
मानाचा समजला जाणारा बालसाहित्यचा द्वितीय पुरस्कार करमाळ्याच्या साहित्यिक अंजली राठोड श्रीवास्तव यांच्या छोटुली सिआरा या बालकाव्यसंग्रहास प्राप्त झाला.
प्रमाणपत्र,शाल, सन्मानचिन्ह श्रीफळ व पुरस्कृत साहित्यिकांचा परिचय व माहिती असलेले पुस्तक व दिवाळी अंक भेट स्वरूपात देऊन मा.अंजली राठोड श्रीवास्तव यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्रीराम पचिंद्रे (संपादक पुढारी) यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ विनोद परमशेट्टी,मा.डाॅ रविकांत पाटील.मा डॉ, विल्यम ईसापुरे,माजी महापौर मा.किशोर जामदार ,मा.नवनाथ गोरे (साहित्य अकादमी विजेते)तसेच सारांशचे व्यंगचित्रकार सल्लागार संपादक मा.डाॅ अनिल दबडे, डॉ विजय माने(उपसंपादक सारांश मिरज) यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
बालसाहित्याचा यथोचित सन्मान स्विकारताना अंजली राठोड श्रीवास्तव यांनी सारांश चे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले.
“काव्य, कादंबरी, ललित, बालसाहित्य, वैचारिक लेख, शोधनिबंध,कथा,अशा विविध साहित्याला माझी लेखणी स्पर्शून गेली आहे.माझ्या सगळ्याच पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आज मोबाईलच्या अतीवापराने मुले अवांतर वाचन विसरली आहेत.म्हणून मी बालसाहित्यावर भर देत आहे.वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चला आपण मिळून प्रयत्न करू या”.असे मत साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या अंजली राठोड श्रीवास्तव यांनी मांडले.
खोट्या पुरस्काराच्या मागे लागून आपली किंमत कमी करु नका,चा़ंगल्या व पारदर्शकता असलेल्या ठिकाणीच आपली पुस्तके स्पर्धेसाठी पाठवा असे मत मा.पचिंद्रे सरांनी मांडले.तसेच इतर मान्यवरांनी ही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
भोजना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
