करमाळा प्रतिनिधी  

           कोल्हापूर विशालगड गाजापुर येथील गरीब मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थळावर केलेल्या हल्ल्याची चौकशी होऊन दोषी वर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी आज करमाळा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने आज तहसील कार्यालयामध्ये मंडलाधिकारी सत्यवान घुगे व पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी, मौलाना मोहसीन शेख, मौलाना अन्वर शेख यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

        यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशालगड गाजापुर येथे दि. १४ जुलै रोजी अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून काही गरीब अल्पसंख्यांक समाजातील नागरिकावर हल्ला करून त्यांची दुकाने, घरे,  चार चाकी वाहने, दुचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली तर धार्मिक स्थळांची ही तोडफोड करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री यांनी त्वरित या प्रकरणा बाबत चौकशी करून समाजकंटकावर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

          यावेळी माजी नगरसेवक फारुक जमादार, फिरोज बेग, इंदाज वस्ताद, मजहर नालबंद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, सोहेल पठाण, वस्ताद समीर दाऊद शेख, तौफिक शेख, मतीन बागवान, समद दाळवाले, मुस्तकिन पठाण, जावेद आतार, असीम बेग, शाहरूख शेख, बंडू शेख, समीर सिकंदर शेख, मुख्तार पठाण, इमरान घोडके, इस्राईल कुरेशी, सरफराज पठाण, ईन्नुस पठाण, मुकबीर कुरेशी, उमर मदारी, अमन बागवान, साबीर तांबोळी, वाजीद शेख, राजु तांबोळी, आदी जणांच्या निवेदनावर सह्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *