करमाळा प्रतिनिधी

झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक च्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरनामध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीचे नियोजन कुंभेज फाटा येथिल श्री जोतिर्लिंग मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. सर्व बालगोपालांच्या टाळाच्या व

भजनाच्या आवाजात सर्व परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या यामध्ये रिंगण, फुगडी, काटवट, भक्तीगीते, नृत्य या पारंपरिक कला विष्कारांचा समावेश होतो. तसेच अनेक विद्यार्थांनी विविध संतांची रूपे साकारली होती. या सोहळ्यामध्ये विध्यार्थ्यांचा उत्साह अतुलनीय होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले सर व

खजिनदार आशाताई बिले मॅडम यांनी सर्व बाल गोपाळ वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे विद्यमान सचिव युवराज बिले सर व संचालिका डॉ. स्वाती बिले मॅडम तसेच मंगल कार्यालयाचे मालक अनिलशेठ कादगे यांनी सपत्नीला विठ्ठल व रुक्मिणीची विधिवत पूजा करुन कार्यक्रमास सुरुवात केली. याप्रसंगी पालकांनीही खूप उत्साहाने वारकऱ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका, मुख्याध्यापक,  विभागप्रमुख, सर्व स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *