करमाळा प्रतिनिधी

न्यू इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथील छोट्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे येऊन बालदिंडी काढून सामाजिक संदेश दिला.

न्यू इरा पब्लिक स्कूलच्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व संदेश देणारे फलक घेतले होते. झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, निसर्गाचे संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देणारे फलक होते.

विद्यार्थ्यांनी अभंग, भारुड, संतांची माहिती, गोल रिंगण, पारंपरिक फुगडी सादर केली.

विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई,मुक्ताई, जनाबाई, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ,गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या होत्या. वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा करून स्कूल मध्ये दिंडी काढण्यात आली होती. ओंकार नितीन टकले आणि सानवी गणेश कसबे यांनी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख परिधान केला होता.

यावेळच्या दिंडीचे वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेले भव्य रिंगण सोहळा होय. यामधे तुळशीवृंदावन घेतलेल्या मुली, टाळ घातलेली मुले आणि भगवा पताका खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांनी भव्य रिंगण सोहळा पार पाडला. या सोहळ्याचे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे अश्व रिंगण. या अश्व रिंगण सोहळयाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल असे रिंगण घातले.

      यावेळी चिखलठाण येथील माळकरी दाम्पत्य लक्ष्मण सुखदेव पवार व विजया लक्ष्मण पवार यांच्या हस्ते श्री विठठलाच्या व रुक्मिणी मातेच्या मूर्तींची पूजा करण्यात आली.

     हा सोहळा संपन्न करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनिल अवसरे, मुख्याध्यापक कसबे सर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ड्रायव्हर बंधू आदिंनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *