
करमाळा प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र संगोबा या ठिकाणी अनेक जिल्ह्यांतून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. संगोबा तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी दाहावा-तेरावा देखील मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी

लागते. पोथरे निलज ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी फिल्टरचे मशीन बसवण्यात आले. परंतु गेली सात महिन्यापासून संगोबा, निलज, पोथरे येथील आरो फिल्टर टोकन टाकून देखील अर्धा लिटर सुद्धा पाणी यातून मिळाले नाही.

संबधीत आरो फिल्टरची मिशनरी देखील निकृष्ट दर्जाची आहेत. यामध्ये ठेकेदाराने मोठा भ्रष्टाचार केलेला असून यांची लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच आठ दिवसांच्या आत आरो पाणी फिल्टर संगोबा पोथरे येथे चालू न झाल्यास गटविकास अधिकाऱ्यांस पाण्यानें अंघोळ घालणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
