
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात मोहरमचा सण मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला दिनांक सात जुलै रोजी शहरातील भुईकोट किल्ल्यात मानाची नालसाहेब सवारी तर बारा जुलै रोजी कुंभारवाडा येथील अल्लाउद्दीन साहेब सवारी, मोहिदिन तालीम येथील सवारी, पंजाब वस्ताद चौक येथील कुरेशी यांची सवारी, सुतार तालीम येथील पाच पंजे सवारी, खाटीक गल्ली येथील नाले हैदर सवारी, भवानी पेठेतील लालन साहेब सवारी, मौहला गल्ली येथील फरीद मास्तर सवारी, रंभापुरा येथील दुधाट यांची

सवारी, खडकपुरा येथील माहुले यांची सवारी, मौलालीनगर येथील मदारी समाजाची सवारी, आदी ठिकाणी सवारी ची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तसेच डोलेही बसवण्यात आले होते. दिनांक 13 जुलै ते 17 जुलै या काळात सर्व सवारी ची शांततेत शहरातुन मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये भुईकोट किल्ले येथील मानाची नाल साहेब यांची सवारी आज सकाळी नऊ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून शांततेत मिरवणूक निघून शहरातील सर्व सवारीला भेटुन दुपारी किल्ला वेस येथे मिरवणूक संपली. तसेच कुंभारवाडा येथील हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य म्हणून समजले जाणारी कुंभार समाजाची सवारी दुपारी बारा वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघून दुपारी किल्ला वेस बारवे जवळ मिरवणूक संपली.

सदर मोहरम सण यशस्वी करण्यासाठी मोहरम कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजी अल्ताफ शेठ तांबोळी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शिंदे, माजी नगरसेवक फारूक जमादार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख, मोहरम कमिटीचे सदस्य जाकीर वस्ताद, जाफर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष सोहेल पठाण, हाजी समीर शेख, आलीम शेख, अरबाज बेग, मुस्तकिन पठाण, समीर शेख, शाहरूख शेख, सुर्यकांत चिवटे, मोहन परदेशी, उमर मदारी, मोहम्मदहाफिज कुरेशी, बबन दुधाट, दस्तगीर पठाण, माहुले, हलवाई आदी जणांनी परिश्रम घेतले. त्यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, गणेश दळवी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
