
करमाळा प्रतिनिधी
शोभा फाउंडेशन तर्फे चि.सौ.कां. अंकिता हिच्या लग्नात 25000 भांडी कन्यादान म्हणून भेट*
शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच रामवाडी गावचे सरपंच मा.गौरवदादा सुभाष झांजुर्णे हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांनी शोभा फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत व्यसनमुक्ती, महिला सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर असे विविध उपक्रम राबविलेले आहेत. याबद्दल रामवाडी ग्रामस्थांना त्यांचा वेळोवेळी सन्मानही केला.
यावेळी त्यांनी रामवाडी ( निमतवाडी ) येथील रहिवासी आबासाहेब गुलाबराव शिर्के यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. अंकिता हिच्या लग्नासाठी शोभा फाउंडेशन तर्फे 25 हजार रुपये किंमतीचा भांडीसेट नववधूस कन्यादान म्हणून दिला. वधुपित्याने त्याचा स्वीकार करून गौरव दादा झांजुर्णे यांचा सन्मान केला यावेळी रामवाडी ग्रामस्थ व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
