
करमाळा प्रतिनिधी
विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करमाळा तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन बैठक ही दिनांक – 11 जुलै 2024 रोजी महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये आयोजित

केली होती. या कार्यक्रम प्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंदजी फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, नदीम शेख, धारूरकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

विलासरावजी घुमरे सर यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच नरेंद्र पवार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सत्येन जाधव, धारूरकर यांनी मार्गदर्शनपर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका क्रीडा समन्वयक प्रा.राम काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जाधवर, नेताजी सुभाष विद्यालय केतुर-२ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी.एम. बरडे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट यांनी मानले. यावेळी मान्यवरांचा सत्कार चंद्रकांत भिसे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, कोर्टी यांनी केला. करमाळा तालुका क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तयार करून हा कार्यक्रम संपन्न झाला.