
करमाळा प्रतिनिधी
शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय अध्यापनासाठी शिक्षक भरती ही कृषी पदविका, पदवीधर व पदव्युत्तर पदवी धारकांची नियुक्ती करावी असा अर्ज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना केला केला आहे.

वरील अर्जात असे म्हटले आहे की, महोदय महाराष्ट्रात कृषी शिक्षक भरतीचे वारे सुरू आहे यात मंत्री महोदयांनी फक्त घोषणा केली पण आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे याची अंमलबजावणी कधी होणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही इयत्ता १ ते १२ वी पर्यंत शालेय शिक्षणामध्ये कृषी विषय हा अनिवार्य म्हणुन समावेश करण्यात आलेला आहे.

कृषी हा तांत्रिक तथा व्यावसायिक विषय आहे. त्यामुळे हा विषय शिकवण्यासाठी देशातील छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये २०१९ ते २०२३ या कालावधीत कृषी पदवीधरांची भरती करण्यात आली आहे. सद्या कृषी विषय हा कार्यानुभव अंतर्गत टाकलेला आहे. मंत्री महोदयांनी असे न करतां कृषीच्या विद्यार्थ्यांना कृषी विषयाचे व्यापक ज्ञान असल्यामुळे विषय शिकवण्यासाठी कृषी पदवीधर, कृषी पदव्युत्तर पदवीधारकांचीच नियुक्ती करण्यात यावी. आमची विनंती मान्य करून लवकरात निर्णय घेवून सबंध महाराष्ट्रातील कृषी बांधव आणि कृषी भगिनींना न्याय द्यावा ही नम्र विनंती.
