
करमाळा प्रतिनिधी
वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्या वतीने नाभिक समाजातील इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदवी पदवीत्तोर मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ, पितृत्व हरपलेल्या विस्थापित कुटूंबातील 26 विद्यार्थी / विद्यार्थीनीना दत्तक पालक योजणेखाली दानशूर व्यक्तीच्या मदतीने अर्थसहाय्य वितरण, उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती / विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा शनिवार दिनांक 16/9/2023 रोजी दुपारी 12-00 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मान्यवरांचे हस्ते व उपस्थित संपन्न होत आहे.

तरी संस्थेचे सर्व सभासद , हितचिंतक, देणगीदार, गुणवंत विद्यार्थी , पालक, दत्तक विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक तसेच सर्व नाभिक बाधवांनी सदर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहून समाजाप्रति आदर व्यक्त करावा असे आवाहन पांडुरंग चौधरी मो.2850281928 यांनी केले आहे.

