
जेआरडी माझा
कुर्डूवाडी पंढरपूर रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मुख्य अभियंता शेलार यांना आदेश…
आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भारतीय जनता पार्टी सरचिटणीस योगेश पाटील यांनी भेट घेतली व कुर्डूवाडी पंढरपूर रस्ता मृत्यूचा सापळा कसा बनला आहे हे सांगितले त्याचबरोबर बावी व रोपळे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली गडकरी यांनी याची तातडीने दखल घेऊन मुख्य अभियंता शेलार यांना फोन करून कुर्डूवाडी पंढरपूर रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने केले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या व अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बाजूला साईड पट्टी वरती असलेली काटेरी जोडपे तसेच रस्त्याला पडलेले भेगा व खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना मुख्य अभियंता शेलार यांना गडकरी यांना फोनवरून केल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजकुमार पाटील व भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य वडशिंगे गावचे सरपंच दत्तात्रय जाधव उपस्थित होते.