
करमाळा प्रतिनिधी
विकास आमृळे यांच्याकडून नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे व कुलस्वामिनी प्रायमरी स्कूल झरे या प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे नियोजित उपक्रमानुसार झरे गावचे सुपुत्र राजेंद्र होनराव यांच्यामार्फत त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृति-पित्यर्थ प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या मान्यवरांनी काळाची पाऊले ओळखून योग्य ठिकाणी मदत केली. त्यांच्या या दातृत्वाबद्दल कुलस्वामिनी प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका बिले मॅडम यांनी आभार मानले.

