कुकडी-उजनी योजना सर्वेक्षणाला मंजुरीचे आदेश : वीट ग्रामस्थांचा जल्लोष !
करमाळा(प्रतिनिधी)- कुकडी-उजनी या व्यावहारिक उपसा सिंचन योजनेसाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी २०२२पासून केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून ही योजना नजीकच्या काळात साकार होऊन त्याचा लाभ तालुक्यातील जवळपास चाळीस गावांना मिळणार हे वृत्त समजताच वीट ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी माजी सरपंच उदय ढेरे,सरपंच महेश गणगे,बाळासाहेब ढेरे,सदस्य बबलू गणगे,चंद्रकांत ढेरे,मिनीनाथ चोपडे,गोरख ढेरे,महादेव जाधव,हेमंत आवटे, अंकुश जगदाळे,दिगंबर चोपडे, अनिल चोपडे,औदुंबर जाधव,सुभाष गाडे,नानासाहेब ढेरे,डॉ.अरुण जाधव,अशोक ढेरे,सचिन गाडे,दादासाहेब जाधव-पाटील,तुषार ढेरे,मचिंद्रनाथ जाधव,संदीप ढेरे,भाऊसाहेब गायकवाड, सुभाष आवटे,मारुती गाडे,बालाजी आवटे,भाऊसाहेब गाडे,श्रीकांत ढेरे,विशाल गाडे,काकासाहेब चोपडे,दीपक गाडे,एकनाथ जाधव,गणेश शिंदे,गणपत ढेरे आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी फटाके फोडून,पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या योजनेचे जनक आमदार संजयमामा शिंदे यांच्या या मागणीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दि.१ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले तर २ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदाचे सचिव डॉ.अरुण बेलसरे व महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना सर्वेक्षणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह रामराजे निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,आमदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.आमदार शिंदे यांच्या प्रयत्नातून ही योजना मार्गी लागल्याचे वृत्त समजताच आज वीट व परिसरातील ग्रामस्थांकडून जल्लोष करून आनंद व्यक्त करण्यात आला आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *