करमाळा प्रतिनिधी

शंभूराजे जगताप यांना भाजपा युमो जिल्हाध्यक्ष पदावरून बडतर्फ केल्याचे पत्र समाज माध्यमाद्वारे वाईरल झालेले होते त्यात त्यांनी पक्षाविरोधात काम केले आहे असे सांगून बडतर्फ करण्यात आले होते. तर त्यांनी पक्षाविरोधी काय काम केले हे सिद्ध करावे असे पत्र भाजपा युमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांना शंभूराजे जगताप यांनी पाठविले आहे.

या पत्रात असे म्हटले आहे कि, समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेले बडतर्फीचे पत्र पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार व्यक्तीशः मला मिळण्या आगोदर समाज माध्यमात प्रसिद्ध झाले. तसेच या पत्रात मी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता मी पक्ष प्रवेश केल्यापासून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे. मी कोणतेही पक्ष विरोधी काम केलेले नाही. मी सदैव पक्ष वाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत व अद्याप करत आहे. परंतु, माझ्यावर कोणाच्यातरी सांगण्यावरून अथवा दबावाखाली आपण पक्ष विरोधी कामकाजाचा ठपका ठेऊन माझ्यावर बडतर्फीची कार्यवाही केलेली आहे असे समाज माध्यमातून कळत आहे. सदर कार्यवाहीत तथ्य असेल तर ते पक्षाच्या शिष्टाचारास अनुसरून नाही. अगोदर आपण पक्ष विरोधी काम केल्याचा योग्य तो पुरावा सिद्ध करावा व पक्षाच्या शिष्टाचारास अनुसरून त्या बाबतीत योग्य तो खुलासा द्यावा. असे या पत्रात लिहिले आहे.

हे पत्र माहितीसाठी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *