करमाळा प्रतिनिधी

बिटरगाव येथे एस टी सेवा नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत हे लक्षात घेऊन तेथे एस टी सेवा चालू करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (शरद पवार गट) जिल्हाउपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी एस टी डेपो येथे पत्र दिले आहे. पत्र देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे, करमाळा तालुका अध्यक्ष हनुमत मांढरे-पाटील, अमोल सुरवसे, इ. उपस्थित होते.

वरील पत्रात असे सांगितले आहे कि, बिटरगाव (वा) हे गांव असुन या ठिकाणी एस. टि. सेवा नाही. यामुळे शैक्षणीक शिक्षण घेणारे विद्यार्थी विध्यार्थीनी यांना शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यागावातील विद्यार्थांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. तरी आपणास विनंती आहे. आपण स्वतः लक्ष घालुन एस. टि. सेवा तात्काळ चालु करावी असे या पत्रात म्हटले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *