करमाळा प्रतिनिधी  

करमाळा तालुक्यातील विविध सजामधे असणारी तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाचे बांधकामांकरीता नागपुर अधिवेशनात आमदार संजयमामा शिंदे यांनी भरीव निधी मंजूर केलेला असुन टेंडर प्रक्रिया होवुन सदर सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत अशी सुचना ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे. केत्तुरसह अनेक ठिकाणची जुनी कार्यालये खराब स्थितीत असुन त्याची पडझड होत आहे. त्यामुळे सदर कार्यालयांची बांधकामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

नागपुर हिवाळी अधिवेशनात करमाळा तालुक्यातील विविध सजातील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे इमारतीं करीता आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रयत्नातून निधी उपलब्ध झालेला असुन या इमारतींची कामे तात्काळ होणे गरजेची आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *