करमाळा प्रतिनिधी

२१ मे रोजी घडलेल्या बोट दुर्घटने पासून उजनी जलाशयातील कुगाव ते शिरसोड, कुगाव ते कालठण, चिखलठाण ते पडस्थळ, ढोकरी ते गंगावळण, आदी मार्गावरील जलवाहतूक बंद आहे. सध्या नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असून करमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील शेकडो विदयार्थी – विद्यार्थिनीं शिक्षणासाठी इंदापूर तालुक्यात दररोज ये-जा करणारे आहेत. या परिसरातील नागरिक वैद्यकिय उपचारासाठी इंदापूर, अकलुज व बारामती येथे जातात. टेंभूर्णी मार्गे

अथवा राशीन भिगवण मार्गे जवळपास ९०-१०० किमी अंतर जावे लागते म्हणून या जलाशयात मंजूर पूल पूर्णत्वास येईपर्यंत ही जलवाहतूक चालु असणे आवश्यक आहे. बोट चालकांना नियम व अटी-शर्ती घालुन व प्रवाशांच्या सुरक्षीततेची साधने सक्तीची करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींच्या मजबूतीबाबत व सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणेकडून वेळोवेळी तपासणी करावी. कारण ही वाहतूक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जर ही जलवाहतूक सेवा पूर्ववत सुरू झाली तर सर्वांना दिलासा मिळेल. असे मत भाजपा जिल्हा यूवामोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *