करमाळा प्रतिनिधी

नेरले येथील जल जीवन विहिरीचे काम न करता अपहार केलेल्या निधीची कागदपत्रे न दिल्यामुळे उपोषणाचा इशारा नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे.

नेरले तालुका करमाळा येथे जलजीवन अंतर्गत 95 लाख रुपये निधी मंजूर आहे. त्या निधीमधून विहिरीचे काम न करताच जुनीच पाणीपुरवठाची विहीर दाखवून सुमारे सात लाख रुपये निधी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांनी संगणमताने उचलून अपहार केला. त्याविषयीची मागणी केली कागदपत्रे दोन महिन्यापासून देत नसल्यामुळे कागदपत्रे दिनांक 14/ 6/ 2024

पर्यंत न दिल्यास आम्ही ग्रामस्थ ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय करमाळा येथे कागदपत्रे मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे. निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक करमाळा, गटविकास अधिकारी करमाळा व अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा करमाळा यांना ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे दिले आहे. त्या निवेदनावर अजित जयहरी सावंत, दादासाहेब सौदागर दौंड, अभिमान जगताप, सरपंच रावसाहेब गलांडे, युवराज महाडिकK इत्यादी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *