करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातून बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन मिळवणारा पहिला खेळाडू अथर्व अमोल राठोड….

देशमुख चेस क्लासेस, करमाळा चा विद्यार्थी अथर्व अमोल राठोड याने पुणे येथे झालेल्या रॅपिड फिडे रेटिंग स्पर्धेत उत्तुंग यश मिळवत आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन मिळवले.

अथर्व अमोल राठोड हा U15 गटातून 1588 रेटिंग मिळवणारा करमाळा तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला.

सध्या तो डि. जी. पाटील विद्यालय, करमाळा येथे इयत्ता 10 वि ला शिक्षण घेत आहे. पुढील वाटचालीस अथर्वला करमाळा चेस असोसिएशनचे प्रा. नागेश माने सर, सचिन साखरे, मुकुंद साळुंके सर, शंभू मेरूकर, सचिन दळवे सर, विजय दाळवाले यांनी व शहरातील मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. करमाळा तालुक्यातुन ग्रँडमास्टर खेळाडू घडवण्याचे ध्येय ठेऊन पृथ्वीराज देशमुख बुद्धिबळ या खेळातील मार्गदर्शन सर्व खेळाडूंना मोलाचे ठरेल व करमाळा तालुक्यातून ग्रँडमास्टरचे ध्येय ठेऊन करमाळा तालुक्याचे नाव देशपातळीवर बुद्धिबळ खेळामध्ये नोंदणी होईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *