करमाळा प्रतिनिधी

सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत अशी माहिती करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे यांनी दिली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघातून नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाच अधिक मताधिक्य मिळाले आहे यामुळे सध्या करमाळा तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांची ताकद मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार नारायण पाटील, बारामती अँग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले याचा फायदा या लोकसभा निवडणुकीत झाला आहे. आगामी काळातही शेतकरी गोरगरीब सामान्य नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अहोरात्र अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी आम्ही तत्पर आहे असेही अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी सांगितले आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *