करमाळा प्रतिनिधी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाने आत्मसात करणे काळाची गरज असलेचे मत भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी व्यक्त केले आहे. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भाजपा संपर्क

कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय आण्णा घोरपडे यांचेही भाषण झाले. यावेळी ते म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट सर्वांनी अभ्यासून घ्यावा व त्यांच्या प्रेरणेने आपण सर्वांनी कुशल संघटनात्मक काम करावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव,  तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,  सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपसरपंच अमोल पवार, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे,  मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलभाऊ शिंदे,  मिरगव्हाणचे सरपंच मच्छिंद्र हाके,  दहीगावचे उपसरपंच लक्ष्मण शेंडगे, 

वस्ताद अजिनाथ कोळेकर,  दादासाहेब देवकर, अशोक सातपुते, दीपक शेळके, सोमनाथ घाडगे, भैया गोसावी, प्रवीण शेळके, संदीप रेगुडे,  जयंत काळे पाटील,  प्रकाश ननवरे,  किरण बागल,  किरण शिंदे, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, रेणुका राऊत, पूजा माने, चंपावती कांबळे, संजय जमदाडे, विवेक अवसरे, ऋषिकेश घाडगे, दादासाहेब गाडे, बंडगर गुरुजी, संजय किरवे, शरद कोकीळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *