
करमाळा प्रतिनिधी
श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या सहा महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे,

सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून आज गुरुवार दिनांक ३०/५/२०२४ रोजी ज्ञानेश्वर लक्ष्मण गायकवाड रा. परांडा यांच्या कडुन २१००/- ( दोन हजार शंभर फक्त) देणगी प्राप्त झाली आहे. या निमित्त त्यांचा सत्कार व्यवस्थापक अशोककुमार गाठे व लक्षमण हवालदार यांनी केला.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्नोधाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४
