
करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रामधे मौजे कुगाव ते कळाशी दरम्यान काल अतिशय दुःखद घटना घडली. लाँच द्वारे प्रवास करताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट उलटल्यामुळे सहा ते सात जणांना जलसमाधी मिळाली. घटनेनंतर तातडीने रेस्क्यु ऑपरेशन एनडीआरएफ च्या जवानांनी चालु केले असुन, अशा प्रकारच्या घटना यापुर्वीही घडलेल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी बेकायदेशीर लॉच मधुन येथील नागरिक जवळचा मार्ग म्हणुन हा जीवघेणा प्रवास करतात. परंतु अशा घटना घडल्यानंतर बेकायदा होडी व बोट चालकांविरुद्ध कारवाई केली जाते. परंतु प्रशासनाने या ठिकाणी कायमचे पुल बांधणे गरजेचे आहे. वस्तुतः येथील नागरिकांची देखिल तशी मागणी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा

पवार यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी कुगाव ते कळाशी या पुलास तातडीने मंजुरी दिली होती व पोमलवाडी ते चांडगाव च्या पुलाचे देखील इस्टीमेट करायला सांगितलेले आहे. परंतु काल रोजी झालेली घटना ही अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान प्रचंड प्रमाणात प्रवासी वाहतुक होत असुन, येथील लोक जवळचा मार्ग म्हणुन बोटीतून प्रवास

करतात. सदरच्या ठिकाणी पुलाचे असणारे अंतर सर्वात कमी असुन ७०० मीटर अंतरात भरावासह पुल होणार आहे. विशेषतः चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान दोन्ही बाजुला पुर्वीचे रस्ते असुन कोठेही संपादनाची आवश्यकता नाही. सदर पुल झाल्यास नगर जिल्हा हद्दी पासुन ते लोणी देवकर (एन एच-६५) चे अंतर फक्त ९ किमी वर येणार आहे. या पुलामुळे फलटण-नातेपुते-बारामती-अकलुज-पंढरपुर कडे जाणारी येणारी वाहतुक वाढणार आहे. जो प्रवास आज बोटीतून जीव घेणा पद्धतीने होतोय तो

पुल झाल्यास सुखकर होणार आहे. या पुलामुळे मराठवाडा चे पश्चिम महाराष्ट्र कनेक्शन होणार असुन याबाबतचा पाठपुरावा चालु असुन याकरीता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार संजयमामा शिंदे करमाळा, नामदार दत्तामामा भरणे यांचेमार्फत प्रयत्न चालु आहेत. तसेच या पुलासाठी केत्तुर व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीने ठराव करून देखिल मागणी केली आहे. या करीता शासन स्तरावरून विचार चालु असुन हे पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे ग्रामस्थांचा जिवघेणा प्रवास थांबणार आहे.