करमाळा प्रतिनिधी

करमाळा हिवरवाडी रोडचे काम आठ दिवसात चालू न केल्यास संबंधित बांधकाम अधिकाऱ्यास काळे फासू असा इशारा आरपीआय नेते तथा आदिनाथचे माजी व्हाईस चेअरमन रमेश कांबळे यांनी दिला आहे.

करमाळा शहरातील नागोबा मंदिर पासून ते हिवरवाडी पर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी हिवरवाडी गावातील ग्रामस्थ, नागरिक, महिला रोज ये जा करत असतात. पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी तर जाणे मुश्किल

होत आहे. रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ते आहेत हे समजत नाही. या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहे. याकडे बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर रस्ता करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला काळे फासू असा इशारा आरपीआय नेते रमेश कांबळे यांनी दिला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *