करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी सोलापूर डिसीसी बँकेच्या वसूली व ठेवी बाबत आढावा बैठकीसाठी करमाळा दौऱ्यावर आले असता बँकेचे माजी व्हाईस चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांची
बाजार समितीच्या कार्यालयात भेट घेत वसूली व ठेवी बाबत आवाहन व चर्चा केली. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई, विशेष वसूली अधिकारी आर. एन. जाधव, बँकेचे अधिकारी, गटसचिव उपस्थित होते.