करमाळा प्रतिनिधी
43 माढा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा शहरात भाजपा शहर कार्यकारिणीचे सर्व जुने-नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला
लागले असून निंबाळकर यांचा होम टू होम प्रचार करीत आहे. करमाळा शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देणार असा विश्वास भाजपचे शहर सरचिटणीस यांनी होम टू होम प्रचार फेरी दरम्यान बोलताना व्यक्त केला.
माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक येत्या 7 मे रोजी होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात अनेक उमेदवार उभे असून खरी लढत महायुती चे रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि इंडिया आघाडीचे
धैर्यशील मोहिते पाटील या दोन उमेदवारांमध्ये आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभेमध्ये अनेक विकासकामे केलेली असल्यामुळे जनता त्यांच्या कामावर खुश आहे. एक अनुभवी लोकप्रतिनिधी आणि सदाचारी व्यक्तिमत्त्व म्हणून जनता त्यांच्याकडे आदराने पाहत आहे. त्यांच्या लोकप्रतिनिधी ची माढा लोकसभेला गरज असल्याने त्यांच्या विजयासाठी भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करून कोणतीही अपेक्षा न ठेवता अथक परिश्रम घेऊन कमळ निशाणी घरघरात पोहचवून दुसऱ्यांदा माढा मतदार संघाचा शिलेदार म्हणून निवडून पाठवण्यास उत्सुक आहेत.