
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर चारा छावण्या ताबडतोब चालू करण्यात यावे अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली. करमाळा तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण

झालेली आहे. सालसे, आळसुंदे, वरकुटे, नेरले, आवाटी, कोळगाव, हिवरे, फिसरे, मिरगव्हाण, भालेवाडी, करंजे, हिसरे, बोरगाव, बाळेवाडी, तरडगाव, पाडळी, घारगाव, वडाचीवाडी, दिलमेश्वर, निलज, पोथरे, खांबेवाडी, धायखिंडी, हिवरवाडी, भोसे, पुनवर,

वडगाव, रावगाव, वंजारवाडी, मोरवड, वीट, पिंपळवाडी, रोशेवाडी, झरे, देवळाली, खडकेवाडी, राजुरी, पोधवडी, कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, कुंभारगाव, सावडी तालुक्यातील या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई व चारा टंचाई आहे. प्रशासनाने ताबडतोब या

गावांमध्ये टँकर चालू करून चारा छावण्या चालू करण्यात याव्या अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, गणेश इवरे, दादासाहेब

महानवर, समाधान मारकड, निलेश कोकरे, नवनाथ कोळेकर, नितीन तरंगे, संदीप मारकड, धनाजी कोळेकर, किशोर शिंदे, निलेश पडवळे, आजिनाथ शिंदे, अनिल तेली, आबासाहेब तरंगे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
