
करमाळा प्रतिनिधी
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आज करमाळा येथील पंजाब वस्ताद चौकातील नुरानी मस्जिद येथे अल-कुरेश यंग ग्रुपच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे, माजी नगराध्यक्ष

वैभवराजे जगताप, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख उपस्थितित ईफ्तार पार्टी संपन्न झाली. याप्रसंगी करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर, माजी नगरसेवक अजितसिंग परदेशी,

दादाराम लोंढे, दिगंबर रासकर, ॲड. नवनाथ राखुंडे, जोतिराम ढाणे यांचे सह शहरातील आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठीत नागरीकांसह अधिकारी,पदाधिकारी व हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत

माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक नजीर अहमद शेख यांचेसह अल-कुरेश यंग ग्रुपच्या सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक युसूफ शेख यांनी तर आभार अनिस बागवान यांनी मानले.
