
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपालिकेने प्रभाग क्रमांक एक मधील नादुरुस्त बोअरवेल दुरुस्त करून त्यावर इलेक्ट्रिक मोटारी बसून तसेच नवीन पाण्याच्या टाक्या बसवुन पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करमाळा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका बानू फारूक जमादार यांनी मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यातच उजनी धरण मायनस मध्ये गेल्यामुळे करमाळा शहराला होणारा पाणीपुरवठा संपूर्णपणे विस्कळीत झालेला आहे तसेच दहिगाव पंपिंग स्टेशनला होणारा विद्युत पुरवठा अनेक वेळा खंडित होतो त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे त्यामुळे शहराला दोन ते तीन दिवसाआड

पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील संभाजीनगर कुंभारवाडा शेजारी बंद पडलेला बोअरवेल, तसेच कन्या शाळा दगडी रोड येथील बंद पडलेला बोअरवेल हे दोन्ही बोअरवेल दुरुस्त करून त्यावर इलेक्ट्रिक मोटारी टाकून व शेजारी नवीन पाण्याच्या टाक्याबसवुन पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच किल्ला वेस नजीक असणारे बोअरवरून

महादेव मंदिर बारवे जवळ नवीन पाईपलाईन टाकून एक कनेक्शन देण्यात यावे त्यामुळे प्रभाग क्रमांक एक मधील पाण्याची व्यवस्था होईल व पाणी टंचाई जाणवणार नाही. एप्रिल ते जून या तीन महिन्यात पाणी टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने शहरातील सर्वच नादुरुस्त बोअरवेल चा सर्वे करून सर्व बोअरवेल दुरुस्त करून त्यावर इलेक्ट्रिक मोटर टाकून

नवीन पाण्याच्या टाक्याबसवुन पाणीपुरवठा केल्यास शहराला होणारी कृत्रिम पाणीटंचाई जाणवणार नाही. यासाठी शासनाच्या पाणीटंचाई योजनेतून सदरचे काम लवकरात लवकर करण्यात यावे असे या निवेदनात म्हटले आहे.
