करमाळा प्रतिनिधी

गुरुवर्य खान सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथील विषय शिक्षक यांना करमाळा पंचायत समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ,

सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या ज्ञानाची ही पावती आहे. आणी आपल्या गावाचे नाव सुद्धा उंचावले खरोखरच अतिशय आनंद होत आहे

की आपण शाळेचा देखील आपल्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने कायापालट आपण केलेला आहे‌. आपला आम्हाला आणि ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. आपण असेच मार्गदर्शन करत राहाल. निवडी बद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे

तसेच घारगावच्या माजी सरपंच लक्ष्मी संजय सरवदे, सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे यांनी देखील या निवडीबद्दल त्याचे भरभरून कौतुक केले व पुढील भावी वाटचालीस खूप शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन घारगाव परिसरामध्ये सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *